छत्रपती संभाजीनगर ( महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महानगरपालिका शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या बालवाडी वर्गातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश करून घेण्यासाठी *एक पाऊल पुढे* हा उपक्रम मा. आयुक्त अमोल येडगे यांच्या मागदर्शनाखाली आज सर्व महानगरपालिकेच्या 50 शाळेत राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन मनपा के प्रा शाळा सिडको एन 7 या शाळेत मा.सभापती महिला व बाल कल्याण समिती शोभाताई बुरांडे, मा.आरोग्य सभापती डॉ. सुनीता सोळुंके तसेच मा.नगरसेविका सुरेखा सानप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरून करण्यात आले. तसेच मनपा के प्रा शाळा किराडपुरा no 1 या शाळेत मा.नगरसेवक उसामा कदिर मौलाना ,ब्रिजवाडी येथे काकासाहेब काकडे यांच्या हस्ते, सिडको एन 11 येथे गट नेता शिवसेना किशोर नागरे, मुकुंदवाडी येथे नगरसेविका गंगाबाई भवरे,कमल नरोटे , यांच्या हस्ते शिक्षणाची गुढी उभारून तसेच सर्व शाळेत स्थानिक नगरसेवक यांच्या हस्ते प्रवेश अर्ज भरून प्रवेश करून घेण्यात आले. पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या शाळेत 865 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
आपल्या पाल्याचे /विद्यार्थी चे प्रवेश महानगरपालिका शाळेत घेण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. महानगरपालिका किराडपुरा no 1 , नारेगाव मराठी व उर्दू, ब्रिजवाडी, चेलीपुरा,इंदिरानगर बायजीपुरा, मुकुंदवाडी ,प्रियदर्शनी इंदिरानगर, बणेवाडी, अशोकनगर , सिडको एन 11 अशा अनेक शाळेत पालकांनी प्रवेश घेण्यासाठी गर्दी केली होती. या प्रत्येक शाळेत प्रवेश क्षमता इतके प्रवेश पहिल्याच दिवशी झाले आहेत.
प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व शाळा आणि इयत्ता पहिलीच वर्ग आकर्षक सजवण्यात आला होता, शैक्षणिक गुढी उभारली होती शाळेतील नाविन्यपूर्ण बँड वाजवून फुले टाकून त्यांचे स्वागत केले विद्यार्थ्याचे उंची वजन अशी माप घेऊन त्यांच्या पाऊलखुणा घेण्यात आल्या व *एक पाऊल पुढे* हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांची 30 एप्रिल 2026पर्यंत शाळेतील क्रीडा व संगीत प्रशिक्षक तसेच कला क्रीडा व कार्यानुभव निदेशक आणि बालताई व इयत्ता पहिलीच्या शिक्षकामार्फत *खेळता खेळता शिका* या संकल्पनेतून गाणी गप्पा गोष्टी विविध खेळाच्या माध्यमातून भाषा व गणन विकास सोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक सामाजिक आणि भावनिक विकास करण्यात येणार आहे.
मनपा शाळेत Smart School to Best School प्रकल्प अंतर्गत विविध उपक्रमामुळे गेल्या वर्षी 20 शाळेत प्रवेश क्षमता पेक्षा जास्त प्रवेश झाले होते म्हणून या वर्षी इयत्ता पहिली मध्ये प्रवेशा साठी शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या बालवाडी/ अंगणवाडी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आज पासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मनपा शाळेत आता विद्यार्थी लांबून लांबून येत आहेत म्हणून मां.आयुक्त अमोल येडगे CSR फंड मधून सायकल वाटप करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या मुळे मुला मुलीना शाळेत येण्यासाठी वेळ वाचणार आहे .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.आयुक्त अमोल येडगे यांच्या सूचनांनुसार उप आयुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे आणि ज्ञानदेव सांगळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी नियोजन केले तसेच गोविंद बाराबोटे अधीक्षक आणि सर्व मुख्याध्यापक व शिक्षक, बालताई यांनी प्रयत्न केले आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महानगरपालिका शाळेत पहिल्याच दिवशी 865 प्रवेश… मनपा शाळेत लांब अंतरावरील येणाऱ्या विद्याथ्यांना सायकल वाटप केली जाणार – आयुक्त श्रीअमोल येडगे
Related Posts
Add A Comment

