छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक 06/04/2026 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, यातील आलोसे क्रमांक 1) डॉ विजय दळवी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय बिडकीन यांनी तक्रारदार यांचे बहिणीचे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून देण्यासाठी बक्षीस/मोबदला म्हणून तक्रारदाराकडे पंचासमक्ष १२००/- रुपयांची लाच मागणी करून, पंचांसमक्ष स्वीकारण्याचे कबूल करुन सदर लाचरक्कम त्यांचे दवाखान्यातील सफाई कर्मचारी नारायण ब्राह्मणे यांच्या कडे देण्यास सांगितले असता नारायण ब्राह्मणे याने सापळा कारवाई दरम्यान मागणी केलेली लाच रक्कम आलोसे डॉ दळवी यांच्या साठी सफाई कर्मचारी नारायण ब्राह्मणे यांच्या करवी पंचासमक्ष स्वीकारली असता पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात बिडकीन पोलिस ठाण्यास लाच लुचपत प्रतिबंध कायद्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
सापळा अधिकारी श्री. योगेश शिंदे
पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर तपास अधिकारी श्री संतोष तीगोटे
पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर
मार्गदर्शक :- श्रीमती माधुरी केदार कांगणे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. मोबा.
श्री शशिकांत सिंगारे अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर
श्री. राजीव तळेकर, पो. उप अधिक्षक
ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर
सापळा पथक : – पो. हवालदार इंगळे ,युवराज हिवाळे .
ला. प्र. वि. घटक छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*व्हॉट्सॲप क्र 7720891064
*पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर 9011092777

