छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
तक्रारदार हे त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ने गौण खनिज वाहतूक परवाना घेऊन करत असतात. त्यांचा ट्रॅक्टर हारून शेख, नायब तहसीलदार यांनी दिनांक 04/ 04/ 26 रोजी पकडला असता तक्रारदार यांनी त्यांच्या कडील गौण खनिज वाहतूक परवाना दाखवून देखील हारून शेख याने ट्रॅक्टर मध्ये जास्त वाळू भरतो असे सांगून कारवाई करण्याची धमकी दिली. तक्रारदार यांचा पकडलेला ट्रॅक्टर कारवाई न करता सोडण्यासाठी आणी हद्दीत ट्रॅक्टरची वाळु वाहतूक सुरळीत चालू ठेवन्यासाठी आलोसे याने तक्रारदार यांच्या कडे 25000/ रुपयांची लाच मागणी केली होती. तक्रारदार यांना आलोसे यास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग संभाजी नगर येथे तक्रार केली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 06/04/2026 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, यातील आलोसे क्रमांक 1) हारून शेख यांनी तक्रारदार यांचा पकडलेला ट्रॅक्टर कारवाई न करता सोडण्यासाठी आणी हद्दीत ट्रॅक्टरची वाळु वाहतूक सुरळीत चालू ठेवन्यासाठी 25,000/- हजार रुपयांची लाच मागणी करून, तडजोडी अंती 15,000/- रुपये पंचांसमक्ष स्वीकारण्याचे कबूल करुन त्यातील 10,000/हजार रुपये खाजगी इसम आरोपी युवराज तायडे सेतू कार्यालय चालक यांच्या कडे देण्यास सांगितले असता खाजगी इसम युवराज तायडे याने देखील लाच रक्कम त्याकडे घेऊन येण्यास सांगितले.
हारून शेख, नायब तहसीलदार व खाजगी इसम युवराज तायडे सेतू चालक तहसील कार्यालय सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रारदार याकडे केलेल्या लाच मागणी नंतर दिनांक 06/04/2026 रोजी शासकीय पंच समक्ष सापळा कारवाई आजमावली असता खाजगी इसम युवराज तायडे सेतू चालक याने लाचेची 10, 000/- रुपये स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. व त्यासोबत दोघांचे मोबाईल ही जप्त करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयातून नायब तहसीलदार हारून शेख यांना देखील ताब्यात घेण्यात आले. सापळा कारवाई दरम्यान मागणी केलेली लाच रक्कम आलोसे हारून शेख यांच्या साठी खाजगी इसम युवराज तायडे यांच्या करवी पंचासमक्ष स्वीकारली असता पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यास लाच लुचपत प्रतिबंध कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालय ता. सिल्लोड, जि, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली.
तपास अधिकारी श्री योगेश शिंदे
पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. तसेच श्रीमती माधुरी केदार कांगणे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर.
श्री शशिकांत सिंगारे अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर ,श्री. राजीव तळेकर, पो. उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शन लाभले.
या सापळा पथक मधे पो.हवालदार श्री राजेंद्र जोशी, श्री प्रकाश डोंगरदिवे, श्री चांगदेव बागुल .
ला. प्र. वि. घटक छत्रपती संभाजीनगर.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
*टोल फ्री क्र:- 1064
*व्हॉट्सॲप क्र 7720891064
*पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर 9011092777

