छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आज TV सेंटर, आकाशवाणी रोड परिसरात विशेष पाहणी मोहीम राबविण्यात आली असून या कारवाईदरम्यान एकूण ₹13,000/- इतका दंड वसूल करण्यात आला.
उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान काही नागरिकांकडून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण न करता तो रस्त्यावर टाकला जात असल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकरणी संबंधित नागरिकांना समज देण्यात आली व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे यावेळी आढळून आले.
तसेच नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनजागृती (IEC) उपक्रमही राबविण्यात आला.
या मोहिमेत आर्मी जवान,एस. एम. वाघ, दौलत आर. म्हस्के,
एस. आय सुहास भाले, प्रसाद दांडगे, जवान विजय साबळे
सहभागी होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कचरा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसुली
Related Posts
Add A Comment

