
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स). पैठण रोडवरील चितेगाव येथील बी.जी. अप्लायन्सेस कंपनीच्या गेट समोर आज दिनांक 3 एप्रिल संध्याकाळी ६.१० वाजता १२१९ मी मी व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व पाईप मधून अचानक गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्वरित फारोळा येथून पंपिंग बंद करण्यात आला व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तथापि जलवाहिनीवरील पाण्याचा दाब व पाण्याचा निचरा करण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सदरील दुरुस्ती चे काम सकाळी पूर्ण होईल. यादरम्यान ७०० मीमी व 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनी द्वारे येणारे पाणी सिडको एक्सप्रेस जलवाहिनीद्वारे सिडको येथे वळविण्यात आलेले आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहर परिसराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात येऊ शकतो. माहितीस्तव सविनय सादर.

