
मी दिनेश काकासाहेब गायके (छत्रपती संभाजीनगर.)
आम्ही प्रिंट मीडियामध्ये साधारण वीस वर्षापासून काम करत आहोत. आमच्या निकटवर्ती यांच्या आग्रहास्तव आम्ही गुढीपाडवा 19 मार्च 2026 या हिंदू संस्कृतीच्या नवीन वर्षाचे अवचित साधून महाराष्ट्र न्यूज टाइम्स या नवीन पोर्टलचे व यूट्यूब चैनल चे उद्घाटन केले आहे. हे उद्घाटन मी मोठा वाजा गाजा न करता आमचे जन्मदाते आई-वडील श्री काकासाहेब गायके व सौ कौशल्याबाई गायके यांच्या हस्ते केले आहे.
या न्यूज पोर्टल द्वारे व YouTube, Instagram, facebook या सोशल मीडिया च्या माध्यमातून शहरातील घडलेल्या लाईव्ह न्युज व महत्वाच्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारले आहे.
आम्ही याद्वारे संभाजीनगर शहरातील बातम्या व त्या व्यतिरिक्त सर्व आजूबाजूचे खेडे व तालुके येथील बातम्या कव्हर करणार आहोत.
यात सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, क्राईम , व आध्यात्मिक अशा अनेक प्रकारच्या बातम्या आपणास मराठी, हिंदी ,इंग्लिश या भाषेमध्ये या पोर्टलवर वाचायला व चैनल द्वारे बघायला मिळणार आहे.
तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. व आपल्या परिसरात घडणाऱ्या काही नवनवीन घटना याची माहिती आम्हास कळवावी.
आपला
दिनेश गायके
