खुलताबाद | प्रतिनिधी
खुलताबाद शहरासह परिसराला आज अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य आठवडे बाजारात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक तसेच व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
अचानक आलेल्या पावसामुळे बाजारातील उघड्यावर ठेवलेला भाजीपाला, फळे व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुकानदारांना आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ करावी लागली.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे काही भागांतील वीज वाहिन्यांवर परिणाम झाल्याने खुलताबाद परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून, महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, फळबागा व पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खुलताबादमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; आठवडे बाजारात तारांबळ, वीज पुरवठा खंडित
Related Posts
Add A Comment

