छत्रपती संभाजीनगर, दि. २६ : औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक सुरळीत, निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ मे २०२६ ते २५ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी-कर्मचारी आणि मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता, जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विशेषतः मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात हे निर्बंध लागू राहणार आहेत.
निवडणुकीची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी मतदान केंद्र परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, मेगा फोन, मायक्रोफोन, वायरलेस सेट वापरणे तसेच फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी मतदान प्रतिनिधींनाही लागू राहणार आहे.
बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणालाही कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास परवानगी नसणार आहे. तसेच केवळ अधिकृत वाहनांनाच मतदान केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.
मतदान केंद्र परिसरात निवडणूक प्रचार करणे, मतदारांना धमकावणे किंवा विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकणे यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ज्वलनशील पदार्थ, स्फोटक साहित्य किंवा मतदान यंत्रणा (EVM) आणि नागरिकांना हानी पोहोचवू शकणाऱ्या वस्तू नेण्यावरही बंदी असणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच BNS कलम १६३ अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू
Related Posts
Add A Comment

