छत्रपती संभाजीनगर २५ मे : (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत असताना सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, वीज, वाहतूक अशा प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढला आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला, विशेषतः कांद्याला, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
“शेतकरी स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करून रात्रंदिवस मेहनत घेतो. पिकासाठी कर्ज काढतो, बी-बियाणे व खते विकत घेतो. पण जेव्हा हेच पीक बाजारात विक्रीसाठी घेऊन जातो, तेव्हा त्याला मातीमोल दर मिळतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने करायचे तरी काय?” असा संतप्त सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले असून उत्पादन खर्चही निघत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि बाजारातील व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. मात्र योग्य तो निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
“देशाचा पोशिंदा आजही आपल्या हक्काच्या भावासाठी रस्त्यावर उतरतो, ही अत्यंत चिंतेची बाब आहे,” अशी भावना सामान्य नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको; शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
Related Posts
Add A Comment

